आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

पुणे : मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. एका महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. त्यात या महिलेचा मृत्यू झाला आहे.

मार्केटयार्ड भागात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या रस्त्यावर चालणेही अवघड झाले आहे. या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे. तरी बांधकाम व्यावसायिकांचे हे ट्रक, मिक्सर तीव्र उतारावरुन ये जा करीत असतात. वाहतूक पोलिसांकडून याकडे ‘दुर्लक्ष केले जाते.

राजकारणी आणि लोकप्रतिनिधींकडून पोलिसांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे पायी जात असलेल्या नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. या अनास्थेने आज एका महिलेचा बळी घेतला. हा अपघात बुधवारी (१२ जून) दुपारी साडे बाराच्या सुमारास घडला. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी दाखल झाले आहेत.

रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

get_footer();