महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगुन पैसे कमवण्याचे आमिष दाखवून महिलेची ७,५६०००/- रूपये ची आर्थिक फसवणुक करण्याची घटना वाघोली येथे १७ मार्च ते १९ मार्च दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणीला मोबाईल वरून टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले, त्यसाठी दिलेल्या अकौंट नंबर वर रक्कम जमा करण्यास सांगितले. मात्र बराच काळ वाट पाहूनही काहीही न मिळाल्याने या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अ
द्याप कोनालाही अटक करण्यात आलेली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करीत आहेत.
