महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सिंहगड रस्ता परिसरात नांदोशी येथे पायी जाणाऱ्या वृद्धाला डम्परने चिरडले.दुपारी साडेबाराच्या सुमारास भरदिवसा ही घटना घडली आहे.
मृताचे नाव संजय राजाराम बाबर (वय ५०, रा.जावली, जि. सातारा) असल्याचे समजते. पोलीस अपघात स्थळी पोहचले असून डम्पर चालकास पकडण्याची कार्यवाही सुरु आहे.
नांदोशी परिसरात मोठ्या प्रमाणात दगड खाणी असून अवैध रित्या दगड, डबर वाहतूक अरुंद रस्त्यावरून बेदरकारपणे केली जाते. वळणावर हा अपघात झाला. ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
