स्मार्ट कार्ड “ॲलन दूरध्वनी” सुविधेचा प्रारंभ
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती कारागृहातील १३०० ते १४०० बंद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून “ॲलन दूरध्वनी” सुविधेचा आठवड्यातून ३ वेळा महिन्यातून १२ वेळा ६ मिनिटे ७२/- रु. मध्ये त्यांचे नातेवाईकांसोबत व वकिलांसोबत बोलता येणार आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे बंद्याकरिता सुरू करण्यात आलेल्या “स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी” सुविधेचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती, देशपांडे जिल्हा व सत्र न्यायाधीशमनवर यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक. कीर्ती चिंतामणी तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) मुख्यालय, पुणे व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग, नागपूर यांचे प्रमुख मार्गदर्शनामध्ये बंद्याकरिता ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
कारागृहातील १३०० ते १४०० बंद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून “ॲलन दूरध्वनी” सुविधेचा आठवड्यातून ३ वेळा महिन्यातून १२ वेळा ६ मिनिटे ७२/- रु. मध्ये त्यांच्या नातेवाईकांसोबत व वकिलांसोबत बोलता येणार आहे.
सद्यस्थितीत ०७ “ॲलन दूरध्वनी” सुविधा बसविण्यात आलेल्या असून बंद्यांचा त्यांचे नातेवाईकांशी जास्त वेळ संवाद झाल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल व त्यामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांचे मनपरिवर्तन होईल.
तसेच ॲलन दूरध्वनी सुविधेचा लाभ 20 बंद्यानी घेतलेला असून सद्यस्थितीत 100 स्मार्ट कार्ड ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहे व शिल्लक 700 कार्ड ऍक्टिव्ह करण्याचे काम प्रगती पथावर आहे.
