महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातर्फे डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या समवेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकंदर ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन व संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी संयुक्तपणे शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी दोघांनीही बदलत्या जीवन शैली मध्ये रक्तदानाचे महत्व यावर मार्गदर्शन केले.
उद्घाटना नंतर संकुल संचालकांनी स्वतः सर्वप्रथम रक्तदान केले व सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला. या शिबिराचे नियोजन डॉ. डी. वाय पाटील फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. देवेंद्र शिरोडे, प्रा. आशिष चिंबाळकर व विद्यार्थी प्रतिनिधी कु. गार्गी धनेश्वर, राशी गिल, प्रशांत पाटील यांनी केले. तर डी. वाय. पाटील रुग्णालय पिंपरी, पुणे चे रक्तपेढीचे कर्मचारी डॉ. वैशाली धानके पकाळे, अनिल कांबळे, तेजेश्वरी पांचाळ, समाधान खंदारे, उत्कर्ष जाधव, सारिका पवार व रमेश भंडारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी एकंदर ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी सर्व रक्तदात्यांची भेट घेत आभार मानले.
