महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : काम देण्याच्या बहाण्याने बिबवेवाडीतील एका महिलेस घरी नेऊन लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला बिबवेवाडी येथील असून ती कामाच्या शोधात होती. त्या वेळेस अनोळखी महिलेने तिला काम देते असे सांगून तिच्या सह घेऊन घरी गेली. तिथे तिला गुंगीचे औषध चहा तून दिले.
तिचा मोबाईल व तिच्या गळ्यातील 83 हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेतले. ही घटना १२ जून रोजी दुपारी झाली आहे. अशीच घटना फिर्यादी ची शेजारी असणाऱ्या महीलेबाबत घडला होता. आद्याप कोणालाही अटक केलेली नाही. सहायक पोलिस निरीक्षक काळुखे तपास करीत आहेत.
