महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात जागतिक योग दिनानिमित्त विविध उपक्रमांद्वारे योग दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला कारागृहामधे महिला बंद्यांसाठी योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले.
योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून डॉ. अजिक्य पवार, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्स्य संस्थान यांनी योगातील विविध आसनांमधुन मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते, तसेच योगाभ्यासातून बौध्दिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो याबाबत महत्व विषद केले.
सदर उपक्रम अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, व डॉ. जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) यांचे संकल्पनेतून व स्वाती साठे, कारागृह उप महा निरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवती कारागृह, पुणे, निखिल देशमुख, उपसंचालक, केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे, सी. बी. सी. पुणे विभागीय कलाकार, डॉ. जे. बी. पानपाटील, व्यवस्थापक डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, पो. पी. कदम उपअधीक्षक, पी. बी. भुसारे, उपअधीक्षक एम. एच. जगताप, उपअधीक्षक आर ई गायकवाड, उपअधीक्षक आनंदा एस कांदे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, व्ही. के. खराडे, सुभेदार यांनी कामकाज पाहीले.
