महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्यामुळे गंगाधाम – शत्रुंजय मंदिर रस्त्यावर जड वाहनांच्या वाहतुकीस काही काळ बंदी घालण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शत्रुंजय मंदिर ते गंगाधाम रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत बंद राहील.
ट्रक, डम्पर, मिक्सर, कंटेनर बस अशा जड वाहनांना या मार्गावर बंदी असेल. या बाबत कोणाला काही हरकत, शंका असल्यास ५ जुलै पर्यंत नोंदवता येतील. असे आदेशात सांगितले आहे.
