भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कात्रज नवीन हायवेवरील स्वामी नारायण मंदीराजवळील पडक्या उंच इमारतीवर जिवाची पर्वा न करता धोकादायक रिल्स बनविणाऱ्यांवर तरुण व तरुणीवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे.
दि.२० जून रोजी नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदीर येथील पडक्या उंच इमारतीवरुन एक तरुणी व एक तरुण यांनी त्यांचा जिव घोक्यात घालून एक धोकादायक व्हीडीओ तयार करुन त्याची रिल्स बनविली होती. ती रिल्स सोशल मिडीआवर व्हायरल झाली होती.
त्यावेळी भारती विद्यापीठ पोलीसांनी व्हीडीओची खात्री करुन एक अनोळखी तरुण मुलगा व एक अनोळखी तरुण मुलगी यांचेवर स्वतः चे व इतरांचे जिवीत व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केली आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
तसेच अशा प्रकारे कोणीतीही धोकादायक कृत्य न करणेबाबत पुणे पोलीसांकडुन जनतेस आवाहन करण्यात येत आहे.अशी रिल्स तयार करून समाजमाध्यमात टाकल्यास कडक कारवाई केली जाईल, अस इशारा पोलिसांनी दिला आहे.
