महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भानामती करीत असल्याचे संशयावरून वयोवृध्द इसमास ठार मारण्याचा कट रचुन त्यांच्या गळयावर चाकुने वार करून पसार झालेल्या तिघां अनोळखी आरोपींचा कसलाही पुरावा नसताना माग काढुन सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनु होडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.दि.१५ जून रोजी फिर्यादी यांना रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे यांना पुणे सातारा रोडवरील रांका ज्वेलर्स शेजारील फिश मार्केट समोरील फुटपाथवर पद्मावती येथे अनोळखी आरोपींनी चाकुने गळयावर वार करुन जखमी केले होते.
अनोळखी आरोपीची कसलीही माहिती मिळत नव्हती. सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व तपास पथकाचे स्टाफला योग्य त्या सुचना देवुन तपासाबाबत मार्गदर्शन केले.
आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे यांना बातमी मिळाली फिर्यादी यांना सागर सतीष कुंभार (वय ४१ वर्ष, रा.सी/६/१ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे) याने चाकुने मारुन जखमी केले असुन सध्या तो त्याचे घरी आहे.
लागलीच पोउनि. पोठरे व तपास पथकाचे स्टाफने सागर कुंभार यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा तौरस कारले (रा. बिबवेवाडी) याचे सांगणेवरुन केला असून त्यासाठी तौरस कारले याने ५०,०००/-रु.ची सुपारी दिल्याची कबुली दिली.
सदरचा प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याचे निदर्शनास आल्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सागर कुंभार याने दिलेल्या कबुलीवरुन तौरस कारले यास अप्पर डेपो येथुन ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा सागर सोनार (रा. मोरे वस्ती रांका ज्वेलर्स मागे पुणे) याने सांगितल्याने केला असल्याची कबुली दिली.
त्यासाठी सागर सोनार याचेकडुन दोन लाख (२,००,०००/-) रु. ची सुपारी घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी तौरस कारले याचे कबुली वरुन सागर सोनार (रा.मोरे वस्ती पद्मावती पुणे) यास ताब्यात घेतले.
तपास करता त्याने त्याचे शेजारी राहणारे फिर्यादी हे करणी, भानामती सारखे प्रकार करुन त्रास देत असल्याने व आमचे घर बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याने सदरचे कृत्य केल्याचे सांगितले. व फिर्यादी यांना मारण्यासाठी तौरस कारले यास दोन लाख (२,००,०००/) रु. ची सुपारी दिल्याची कबुली दिली.
दाखल गुन्हयातील आरोपी) सागर सतीष कुंभार (वय ४१ वर्ष, रा.सी/६/१ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे), तौरस बाळु कारले (वय ४३ वर्षे धंदा नोकरी रा.बी/५९/१९ सुपर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे), सागर शशीकांत सोनार (वय ३२ वर्षे धंदा नोकरी रा. मोरे वस्ती रांका ज्वेलर्स मागे पद्मावती पुणे) यांनी कट कारस्थान रचुन संगनमताने सोनु होडे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी नामे सागर सोनार याने दोन लाख (२,००,०००/-) रु.ची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाल्याने तीनही आरोपींना दाखल गुन्हयात अटक केली करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे हे करीत आहेत. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, पुणे स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, नंदीनी वग्यानी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोलीस उप निरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, विनोद जाधव, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, अमित पदमाळे सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, खंड्डु शिंदे यांनी केली आहे.
