महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन ४४,०४,०००/- रू. गुंतविण्यास भाग पडून फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसात एका ५२ वर्षाच्या इसमाने फिर्याद दिली आहे.
१३ जानेवारी पासून गेले काही महिन्यात अनोळखी मोबाईल धारकाने त्यांना शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याला बळी पडून फिर्यादी यांनी वेळोवेळी रकमा गुंतवल्या.
त्यातून त्यांची ४४,०४,००० रुपयाची फसवणुक झाली आहे. सहा महिने झाले तरीही नफा काहीच ना मिळाल्याने त्यांनी अखेर पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करीत आहेत.
















