महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : काही कंपन्या पॉलिसी सरेंडर करण्याच्या नावाखाली एल. आय. सी. पॉलिसी होल्डर्सकडून पॉलिसी मिळवू पाहात आहेत. या प्रकरणात एलआयसीने स्पष्ट केले की त्यांच्या या ऑफर अधिकृत नाहीत. या प्रकरणानंतर एलआयसीने सावधानतेच्या सूचना जारी केल्या आहेत.
देशभरात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. या सर्व ग्राहकांच्या हितासाठी एल.आय.सी. ने एक महत्वाची सूचना जारी केली आहे. लाईफ इन्श्युरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या पॉलिसी धारकांना त्यांच्या इन्श्युरंस पॉलिसीशी संबंधीत अनाधिकृत ट्रांजक्शन बाबत सावध केले आहे.
काही कंपन्या पॉलिसी सरेंडर करण्याच्या नावाखाली एल.आय.सी. पॉलिसी होल्डर्सकडून पॉलिसी मिळवू पाहात आहेत. या प्रकरणात एल.आय.सी. ने स्पष्ट केले की ते या ऑफर अधिकृत नाहीत. लोकांना मोठी रक्कम देण्याचा विश्वास दाखवून त्यांची सध्याची एल.आय.सी. इन्श्युरंस पॉलिसी खरेदी करण्याचे अमिष दाखवले जात आहे.
अशाप्रकारे लोक आपल्या विमा कंपनीला पॉलिसी सरेंडर न करता, त्यांना चुकीच्या पद्धतीने विकत आहेत. एल.आय.सी.ने पॉलिसी धारकांच्या हितासाठी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, एल.आय.सी.चे माजी कर्मचारी/कामगारांद्वारे केलेले कोणतेही वक्तव्य अशा व्यक्तींसाठी व्यक्तीगत आहे. असे एल.आय.सी.ने सांगितले आहे.
पॉलिसीधारकांनी आपल्या पॉलिसीवर कोणताही निर्णय घेण्यापूवी पूर्ण सावधगिरी बाळगावी, ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा आणि त्यांच्या कुटुंबाचे जोखीम संरक्षण धोक्यात येऊ शकते. कोणत्याही ऑफरला उत्तर देण्यापूर्वी, कृपया आमच्या शाखांमध्ये कोणत्याही एल.आय.सी. अधिकारी वर्गाशी संपर्क साधून सल्ला घ्या, असे आवाहन एल.आय.सी.ने केले आहे.
