महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : परराज्यातील मोबाईल चोरटयास अटक करुन त्याच्याकडुन ४ मोबाईल फोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडुन एकुण ७५,००० रुपयांचे चार मोबईल फोन जप्त करण्यात आले असुन आरोपी गणेशकुमार गोंगा महतो यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२१ जुन रोजी भारती विद्यापीठ पोलीस तपास पथकाचे पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, तसेच कात्रज मार्शल कडील सचिन पवार, विठ्ठल चिपाडे हे कात्रज बस स्टॉपचे भागात पेट्रोलींग करीत होते. त्यांना मोरे बाग बस स्टॉपवर मोबाईल चोरणारी दोन मुले थांबली आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ मोरे बाग बस स्टॉप येथे जावुन मुलांचा शोध घेतला. त्यांना गणेशकुमार गोंगा महतो, (वय १९ वर्षे, रा. तिन पहाड, बहपुर, ठाणा राजमहल, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड) व एक अल्पवयीन मुलगा मिळून आला असुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडुन एकुण ७५,००० रुपयांचे चार मोबईल फोन जप्त करण्यात आले आहे.
आरोपी गणेशकुमार गोंगा महतो यास अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, हनमंत मासाळ, सतिश मोरे, सचिन पवार, विठ्ठल चिपाडे, शैलेश साठे, निलेश जमदाडे, सचिन सरपाले, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.
