लिओ क्लब बार्शी टाऊनच्या 2024-25 ची कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : युवकां मध्ये बार्शी मधील समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि विविध उपक्रम राबवून समाजास मदत करणाऱ्या लिओ क्लब बार्शी टाऊन कार्यकारिणीची निवड जाहीर झाली आहे २०२४-२५ च्या अध्यक्षपदी लिओ. गौरव देढिया, सचिव पदी युवा उद्योजक आवेश बंबोली तसेच खजिनदारपदी उदयन सांवत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
प्रथम उपाध्यक्ष लिओ अक्षित परमार, द्वित्तीय उपाध्यक्ष सायली श्रीश्रीमाळ, जॉईंट सेक्रेटरी लिओ पृथ्वी बंबोली, क्लब ऍडमिनिस्ट्रेटर लिओ मधुर कथले, परमनंट प्रोजेक्ट चेअरमन लिओ. दिव्यांश पूनमिया, क्लब सर्विस चेअरपर्सन लिओ श्रेणीक गुंदेचा, सोशल मीडिया लिओ पलक कुंकूलोळ टेमर आदित्य कांकरिया हे २०२४-२५ वर्षासाठी काम पाहणार आहे.
या क्लबचा पदग्रहण समारंभ 14 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे होणार आहे. अध्यक्ष गौरव देढिया हे पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीमध्ये काम करत आहेत, लिओचा संस्थे मध्ये या आधी सर्विस चेअरपर्सन, क्लब प्रोजेक्ट हेड, खजिनदार या पदा वर कार्य केले आहे, तसेच 2022-23 च्या कार्यकाळात त्यांनी लायन्स डिस्ट्रिक 3234 D1 व लायन्स मल्टिपल 3234 मध्ये लिओ बेस्ट ट्रेझरर गोल्ड हे पुरस्कार भूषवले आहेत.
लिओ क्लब बार्शी टाऊन कडून गरजू रुग्णांसाठी अल्पदरात दर मंगळवारी मधुमेह तपासणी कोठारी लैब येथे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर हे उपक्रम गरजू रुग्णांसाठी साठी उपयुक्त ठरत आहेत.
तसेच चाईल्डहुड कॅन्सर, दंत चेकअप शिबीर, पर्यावरण अभियान, अन्नदान, विद्यार्थीनीं सशक्तीकरन व्याख्याने यावर काम करत आहेत. मावळते अध्यक्ष लिओ आदित्य सोनिग्रा क्लबचे सल्लागार एमजेएफ ला. ॲ.वासुदेव ढगे लिओचे माजी प्रांत अध्यक्ष व लायझन लिओ.पवन श्रीश्रीमाळ, लायन्स क्लब बार्शी टाऊन चे नवनिर्वाचित अध्यक्ष एमजेएफ ला.महावीर कदम, ला.अतुलभाई सोनिग्रा, लायन्स क्लब बार्शी टाऊन ट्रस्ट चे अध्यक्ष भरतभाई परमार, डॉ. योगेश कुलकर्णी, ला.प्रकाश फुरडे, ला. रवि बजाज, ला. आनंद पुनमिया, किरण आवटे हेमंत जमदाडे, ला. रवी राऊत व सर्व सदस्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
