महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरात दरोडा टाकण्यासाठी शस्त्रे घेउन जमलेल्या सहा टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या कडून घातक शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्य रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
रुतीक रणखांबे (वय २४ रा. मार्गासनी ता. वेल्हा.) पियुष पोपट लोंढे (रा. लोहियानगर झोपडपट्टी, मगरपट्टा हडपसर) प्रेम बापू चंदनवाले, (वय १९ रा. लोहीया नगर झोपडपट्टी, मगरपट्टा, हडपसर.) रुपेश अशोक गोहीरे, (वय १९ वर्षे, निशांत महादेव कांबळे, (वय १८, चेतन सोमनाथ शिरोळे, वय- २९ रा. तरवडे वस्ती, वानवडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
शस्त्रेजवळ बाळगण्यास बंदी आदेश असताना, त्यांनी प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून, बेकायदेशीररित्या व अनधिकृतपणे हत्यारे, लाल मिर्ची पावडर मोबाईल, केबल जोडलेले अँगल ग्राइंडर इत्यादी घातक शस्त्रे बाळगली होती.,
हत्याराची व साथीदारांची जमवाजमव करून, रात्री जाणाऱ्या मोबाईल फोन व रोकड जबरीने चोरण्याच्या तसेच गांधी चौक परिसरातील दागिण्यांच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोडा टाकण्याची पुर्ण तयारीत असताना पोलिसांना मिळून आले. पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील तपास करीत आहेत.
