जैन बांधवांची मागणी : पोलीस आयुक्तांना दिले निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्टैंडअप कॉमेडियन डॅनियल फर्नांडिस यांच्यावर बंदी घालून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जैन बांधवांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली असून, २७ जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमावरही बंदी घालण्याची विनंती करण्यात आली आहे.
मुंबईचा स्टैंडअप कॉमेडियन डॅनियल फर्नांडिस याने आपल्या कॉमेडीद्वारे एका व्हिडिओद्वारे अत्यंत असंवेदनशील, बेजबाबदारपणे अश्लील टिप्पणी केली आहे. डॅनियल फर्नांडिस स्वतः खिश्चन आहेत. त्यांनी केवळ जैन समाजाचाच नव्हे तर संपूर्ण मानवतेचा अपमान केला आहे.
हे देखील येशू ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात जाते. खिस्ती लोक येशू खिस्ताला मेंढपाळ म्हणतात. त्याने मेंढ्यांबद्दल दया आणि आदर दाखवला आहे. डॅनियल फर्नाडिस यांनी खिश्चन आणि जैन देव आणि संतांच्या तत्त्वज्ञानाची खिल्ली उडवली आहे आणि त्याच वेळी जैन आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, तो निंदनीय आहे.
फर्नांडिस यांचा कार्यक्रम रोखण्यासाठी समस्त जैन समाजाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतरच त्याचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे.
यावेळी हरीश शहा, अक्षय जैन, विलास शहा, नितीन जैन, नीलेश शहा, जिनेंद्र कावेडिया, विनोद सोळंकी, भरत सुराणा, अरुण कटारिया, वालचंद कटारिया, संदीप पारेख, सुनील शहा आदी उपस्थित होते.
