महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याने खूप जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा मात्र या अभ्यासक्रमासाठी विक्रमी १ लाख ९१ हजार १६५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल्याने प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे. कॉम्प्युटर अभियांत्रिकी आणि त्याच्याशी निगडित शाखांच्या प्रवेशासाठी चुरस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सीईटी कक्षाने अभियांत्रिकी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून, यंदा विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. गेल्यावर्षी १ लाख ६१ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत यंदा २९ हजार ८२९ जास्त अर्ज आले आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी १ लाख ५९ हजार ३१७ जागा होत्या. त्यात १ लाख १७ हजार ९३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊन ४१ हजार ३७९ जागा रिक्त राहिल्या होत्या.
यंदा अभियांत्रिकीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याने कॉम्प्युटर अभियांत्रिकी आणि त्याच्याशी निगडित शाखांच्या प्रवेशासाठी चुरस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ४ पासून नोंदवा हरकती सीईटी सेलकडून ३ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना या यादीवर ४ ते ६ ऑगस्टदरम्यान हरकती नोंदविता येणार आहेत. तर सीईटी सेलकडून ८ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. मेकॅनिकल, सिव्हिलला यंदा आशा गेल्या वर्षी मेकॅनिकल आणि सिव्हिल अभियांत्रिकी या शाखांकडे विद्यार्थी फारसे न वळल्याने या अभ्यासक्रमांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या.
त्यात मेकॅनिकलच्या १६, तर सिव्हिलसाठी १२ कॉलेजांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नव्हता. त्यातून या कॉलेजांची स्थिती बिकट झाली होती. यंदा ही परिस्थिती बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
