येरवडा पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अंधाऱ्या रात्री दुचाकी चालकाला चिरडणाऱ्या कंन्टेनर चालकाचा शिताफीने शोध घेऊन येरवडा पोलीस तपास पथकाने त्याला अटक केली आहे.
दि. २० जुलै रोजी कल्याणी नगर जंक्शन, पुणे नगर रोड येरवडा पुणे येथे एका दुचाकी वरुन जाणाऱ्या दोघांना एका भरधाव वेगाने येणारे कंन्टेनर चालकाने पाठी मागुन धडक दिलेली होती. त्यामध्ये सदर दुचाकीचे पाठीमागे बसलेला इशान सुनिल करवडे, (वय ३४ वर्षे) हा तरुण मयत झालेला आहे. व चालक गौरव खंडारे हा जखमी झालेला आहे.
त्यानंतर सदर कंन्टेनर चालक तेथे न थांबता तेथून पळून गेलेला होता. त्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर ट्रक/कंन्टेनर चालकाचा शोध घेत असताना येरवडा पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी १०० च्या आसपास सी सी टी व्हि कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले होते.
त्यामध्ये सदरचा अपघात हा एम. एच. ४६ ए. आर. ४८३६ वरील ट्रक/कंन्टेनर चालकाने अपघात केलेचे व त्यानंतर सदर कंन्टेनर चालक पळून गेलेला असलेचे सी सी टी व्हि कॅमेऱ्यांमध्ये दिसुन आले होते.
त्यानंतर पोलीसांनी सदर कंन्टेनर चालकाच्या मालकाचा शोध घेऊन, अपघाता दिवशी सदर कंन्टेनर चालविणारा चालक मोहंमद अशीम हातीम अन्सारी, (वय ३४ वर्षे, रा. कुन्हारा कला, जि. हजारी बाग, झारखंड) हा असले बाबत रजिस्ट्ररचे नोंदी वरून निष्पन्न झाल्याने, त्यास अटक केलेली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक स्वप्निल पाटील करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४. विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस अमंलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी केलेली आहे.















