• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

उपबाजार व्यापार संकुल उभारणीस मदत करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 12, 2024
0
12 8 24 8
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सातारा बाजार समितीच्या उपबाजार संकुलाचे भूमिपूजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल १५ एकर जागेवर  १३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

खिंडवाडी, सातारा येथे सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले उपबाजार व्यापारी संकुलाचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, जिल्हा निबंधक मनोहर माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकारी व व्यापाऱ्यांसाठी उपबाजार समितीच्या संकुल उभारणी होत आहे याचा आनंद होत आहे. संकुल उभारणीरणीच्या माध्यमातून कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचीही स्वप्नपुर्ती होणार आहे. शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना चांगला बाजार, सोयी सुविधा मिळाल्यातर शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला दर मिळतो.

सातारा जिल्हा शुरविरांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. हा जिल्हा फळ पिकांबरोबर अनेक पिके घेत आहे. येथील उत्पादन महाराष्ट्राबरोबर देशातही जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांचा माल साठवणुकीच्या सर्व सुविधा आहेत. संकुलाच्या उभारणीसाठी शासनही मदत करेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, उपबाजार समितीचे व्यापारी संकुल फाइवस्टार पद्धतीचे उभारण्यात येणार आहे. हे संकुल १५ एकर जागेत उभारले जाणार आहे. सातारा शहरात बाजार समिती असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. लवकरच भाजीपाला व फळ मार्केट येथे सुरु करण्यात येणार आहे.

यामुळे शहरातील वाहतुककोंडी होणार नाही. उपबाजार समिती महामार्गालगत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या संकुलाच्या उभारणीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबरोबर शहराचाही विकास होईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Articles

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘शिवोत्सव’ उत्साहात साजरा

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘शिवोत्सव’ उत्साहात साजरा

March 20, 2026
डॉलर एक्सचेंज करुन देण्याच्या नावाखाली तरुणाला गंडा

डॉलर एक्सचेंज करुन देण्याच्या नावाखाली तरुणाला गंडा

March 20, 2026
कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून

कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाचा खून

March 20, 2026

क्या सच होती है कुंडली की हर बात?

March 20, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
Load More
Previous Post

उरुळी कांचन येथे टेम्पोची ट्रकला धडक, मुलाचा मृत्यू

Next Post

विश्रामबाग पोलिस कोठडीतील आरोपीचा चक्कर आल्याने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta