• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 9, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे भावाची इच्छा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 19, 2024
0
img
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ

पुणे : जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे भावाची इच्छा महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनीच्या फुललेला श्री शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा. अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला.

महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे.

त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. दीड हजार रुपयांचे मोल गरजू बहिणींसाठी खूप आहे. त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल. आता मदतीसाठी कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. महिलांना योजनेचा अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ केली आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. आशा प्रत्येक पात्र भगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल. लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला निश्चित रक्कम जाईल याचे खूप समाधान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महिला भगिनींसाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’च्या माध्यमातून वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला.

भावालाही मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना या दृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढे ही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असे ही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आजचा हा सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल.

सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुपकुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे. विकसित भारत करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो, असे प्रधानमंत्री कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात आम्ही स्त्रियांना केंद्रस्थानी ठेऊन योजना सुरू केल्या.

लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे. ही योजना म्हणजे आम्ही महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्षाबंधनानिमित्त दिलेली ओवाळणी आहे. आईचं आणि बहिणीचं प्रेम जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपयांचे मोल समजते, असेही ते म्हणाले. रक्षाबंधनानिमित्त भावांकडून बहिणीला ओवाळणी.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेला माता-भागिनींकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान, हसू दिसून येत आहे.

रक्षाबंधनानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली आहे. माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा – अपेक्षा असतात परंतु, स्वतःचे हीत बाजूला ठेऊन कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा- अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. या पुढे ही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या हिता करीता बेरोजगारी कमी करण्यासाठी, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी, मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून काम करीत असून नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘यशस्विनी प्लॅटफॉर्म’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, प्रसाद लाड, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहुल कुल, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, सुनील कांबळे, सुनील शेळके, महिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, एकात्मिक बालविकास योजना सेवा आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Indrakumarji Chajed ( Chairman – JITO Pune)

April 8, 2026
विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी स्कूलची ३७ लाखांची फसवणूक

विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी स्कूलची ३७ लाखांची फसवणूक

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Ashishji Bora

April 8, 2026
Load More
Previous Post

मंत्रोच्चारांचे सामर्थ्य मोठे : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

Next Post

पुणे विमानतळ बनले एसटी स्टँड

Recent News

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026
हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु होता हुक्का पार्लर, विना परवाना बार

हॉटेलमध्ये राजरोजपणे सुरु होता हुक्का पार्लर, विना परवाना बार

April 7, 2026
हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

हातचलाखी करणारा सराईत चोरटा जाळ्यात

April 7, 2026
फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

April 7, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Ashishji Bora

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Vijayji Bhandari ( President – JITO Apex )

April 8, 2026

Vishva Navkar Mahamantra Divas 2026 Warm Wishes from Hon. Kantilalji Oswal ( Past President – JITO Apex )

April 8, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

पत्रकार देवेंद्र जैन यांची राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती

April 8, 2026
लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

लक्झरी कारच्या खरेदी विक्री व्यवसायात १ कोटींचा गंडा

April 8, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta