रूट मार्च मध्ये पोलिसांनी केले शस्त्राचे प्रदर्शन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाड़ी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये आगामी येणारे गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सव, या अनुषंगाने दंगा काबु पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली.
गणेशोत्सव व ईद ए मिलाद उत्सवाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अप्पर बस डेपो याठिकाणी दंगा काबु योजना रंगीत तालीम राबविण्यात आली व त्यानंतर अप्पर बस डेपो तय्यबा मस्जिद राजीव गांधी नगर चौक अप्पर जुना बस स्टॉप चैत्रबन वसाहत डॉल्फिन चौक संविधान चौक परत बिबवेवाड़ी पोलीस स्टेशन असा रुट मार्च घेण्यात आला.
दंगा काबु योजना रंगीत तालीम व रुट मार्च करीता बिबवेवाड़ी पोलीस स्टेशन कडील 02 पोलीस निरीक्षक 03 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक व २० अंमलदार यांनी शस्त्र, ढाल, लाठी सह सहभाग घेतला. शांतता कमिटी सदस्य हि रंगीत तालीम पाहण्यास हजर होते.
गणेशोत्सव व ईद ए मिलाद या उत्सव काळातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्त कसा असेल याची थोडक्यात माहिती पोलीसातर्फे देण्यात आली.
