बार्शी तालुका टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अवघ्या आठ वर्षाच्या राजवर्धन तिवारी याला बार्शी तालुका टेबल टेनिस तालुकास्तरीय स्पर्धेत पाच विजेतेपदाचा मान मिळाला आहे.
राजवर्धन तिवारी याला तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ११ वर्षाखालील,१३ वर्षाखालील व १५ वर्षाखालील, १९ वर्षाखालील व ओपन सिंगल्स मुलांच्या गटात विजेतपद मिळाले.राजवर्धन विजयकुमार तिवारी हा राज्यस्तरीय खेळाडू आहे.मानांकन स्पर्धेत त्याला ९ रँकिंग देखील आहे.
राजवर्धन तिवारी,वेदांत खळदे, व वेद खटोड हे अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आले.राष्ट्रीय खेळ दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब, लायन्स क्लब बार्शी रॉयल व रोटरॅक्ट क्लब बार्शी आयोजित तालुकास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा रोटरी क्लब येथे २८,२९.३० ऑगस्ट रोजी पार पडल्या.
या खेळाचे बक्षिस वितरण समारंभासाठी माजी अध्यक्ष अनिल काका बंडेवार, पि. डि.जी.लायन जितुभाई दोशी (माढेकर), रोट्रियन व क्रीडा प्रेमी गौतम कांकरिया लायन्स क्लब च्या अध्यक्षा वर्षा खंडवीकर, व सचिवा अमृता गुंडेवार, रोटरी अध्यक्ष अतुल कल्याणी तसेच रोटरॅक्ट अध्यक्ष गणेश स्वामी, ला.हेमल दोशी, ला.मनीष रुगले व ला.ज्योती रुगले तसेच रोटरियन आनंद बेदमुथा आदी उपस्थित होते.
