पुणे शहरात वाॅर : तीन आरोपी पोलीसाच्या जाळ्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार व तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने त्यांचा केईएम रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. असून या प्रकरणातील तीन संशयित आरोपी सोमनाथ कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, जयंत कोमकर यांना अटक करण्यत आली आहे.
आंदेकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी तीन ते चार संशयितांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्यामुळे शहराच्या मध्य भागात घबराट पसरली.
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तसेच, कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
आंदेकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. घरगुती वादातून जवळच्याच व्यक्तीने फायरिंग केल्याचे समजते. गणेशोत्सवाच्या तोंडावरच शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे.
हल्लेखोराने कोयत्याने वार केले, ते कोसळल्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे ही नगरसेवक होते. वत्सला आंदेकर यांनी देखील पुणे शहराचे महापौरपद भूषविले आहे.
