आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कुख्यात आरोपीस पिस्टलसह जेरबंद करण्यात यश

Spread the love

बार्शी : सोलापुर ते विजापुर महामार्गावरील तेरामैल येथुन, मिरज येथील कुख्यात आरोपीस पिस्टलसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

पोलीस अधीक्षक. अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश पोलीसाना दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवुन त्यांना गुन्हे करणा-या आरोपीवर योग्य ती प्रतिबंध कारवाई करण्यास सांगितले आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर यांना सुचना देवुन आदेशीत केले होते. त्यावरून वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते.

पोलीस उप-निरीक्षक, सुरज निंबाळकर, विजयकुमार भरले यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली कीराहुल माने (रा. मिरज, जि. सांगली) हा सोलापूर ते विजापुर या महामार्गावर असलेल्या तेरामैल येथील ब्रिज खाली एक देशी बनावटीचे पिस्टल व राउंड सोबत बाळगुन उभा आहे.

सुरज निंबाळकर यांनी लागलीच सुरेश निंबाळकर यांना माहिती करविला सुरुवात केली. हायवे वर असलेल्या तेरा मैल ब्रीज जवळ असणा-या सर्व्हीस रोड वर संशयित इसम दिसून आल्याने त्यास लागलीच गराडा घालून जागीच पकडले.

राहुल सतीश माने (वय-31 वर्षे रा. वसंत हाउसिंग सोसायटी माजी सैनिक वसाहत ता. मिरज जि. सांगली) याची तपासणी केली असता त्याच्या कंबरेला मागील बाजूस पॅन्टीत खोचलेला एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह मिळून आला.

त्यानंतर त्याचे खिसे तपासले असता पिस्टलची 02 जिवंत काडतुसे मिळुन आली, राहुल सतीश माने विरूध्द मंद्रुप पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी त्याचेवर सांगली जिल्हयात मिरज शहर, महात्मा गांधी, एमआयडीसी, चिंचणीवांगी, भिलवडी या पोलीस ठाणे मध्ये दरोडा, एनडीपीएस अॅक्ट,आर्म अॅक्ट, चोरी, घरफोडी या सारखे तसेच कर्नाटक येथे आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर व वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक, सुरज निंबाळकर, व पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड,ख्वाजा मुजावर, हवालदार परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, घोरपडे, समर्थ गाजरे, अशोक हलसंगी यांनी बजावली.