आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बोरामणीत पोलिसांचा रूट मार्च

Spread the love

सोलापूर : आगामी काळात साजरे होणारे गणपती उत्सव व इतर महत्वाचे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बोरामणीत पोलिसांचा रूट मार्च निघाला होता.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक. राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बनसोडे, शहाजी कांबळे, हवेल जाधव व सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अंमलदार ३० ऑगस्ट रोजी रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्यासाठी करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले आहे.

बदलापुर शाळे मध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी( दि. 27) रोजी पाकणी येथील निवासी आश्रम शाळेस भेट देऊन तेथे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थिनींना बॅड टच, गुड टच इत्यादी विषयक मार्गदर्शन केले.

तसेच बालकाविषयी व महिला विषयक गंभीर अपराधांची माहिती देऊन त्यांचे मध्ये जागरूकता कशी असली पाहिजे, त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे या विषयक मार्गदर्शन केले. मोबाईल व सोशल मिडियाव्दारे होणा-या अपराधांची माहिती देऊन विद्यार्थिनी सोबत संवाद साधुन शाळे मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत सतर्क राहणेच्या सूचना दिल्या आहेत.

दि. 28 रोजी सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक यांनी बदलापुर येथील घटनेच्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा परिषद शाळा उळे येथील विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच संदर्भात मार्गदर्शन केले आहे.

तसेच शाळेतील उपस्थित शिक्षकांना सतर्क राहणेच्या सूचना दिल्या आहेत. दि. 30 रोजी मनोज अभंग, सहायक पोलीस निरीक्षक यांनी एस.व्ही.सी.एस. कनिष्ठ महाविद्यालय, बोरामणी येथील विद्यार्थी यांना समुपदेशन करून मार्गदर्शन केले.

यापुढेही आगामी काळात येणारे उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्च (पथ संचलन) तसेच बदलापुरच्या घटनेच्या अनुषंगाने शाळे मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व शिक्षक यांचे मध्ये कायद्याची जगजागृती व्हावी या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे शाळेस भेटी देणार असल्याचे संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.