महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे दि.5 सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरधारीलाल तातेड यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, मानद सचिव आनंद पुनमिया, संचालक धीरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी, सुजित गुंदेचा, कमलेश तातेड आदि मान्यवर उपस्थित होते.
गिरधारीलाल तातेड सर यांचा वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ व संचालक धीरज कुंकूलोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे सभासद, व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव यांनी केले, सहायक ग्रंथपाल पल्लवी तौर, विराज पतंगे हे उपस्थित होते.
