आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून तरुणाचा खून

Spread the love

पुणे : गुलटेकडी परिसरात जुन्या वादातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर वार करून खून केला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (दि. ४) रात्री एकच्या सुमारास घडली आहे. साईबाबा मंदिराजवळील कॅनालशेजारी (गुलटेकडी) सुनिल बाबासाहेब सरोदे (वय ३० वर्षे, रा. साईबाबा मंदिराजवळ, गुलटेकडी, पुणे) यांच्यावर जुन्या वादाचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने धारदार हत्याराने गंभीर दुखापत करून त्यांचा खून केला.

त्यांचा भाऊ गणेश बाबासाहेब सरोदे यांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत.