आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हॉटेलमध्ये घुसून मालकाला मारहाण

Spread the love

पुणे : उमर कॉम्प्लेक्स, ईराणी मार्केट गाडीतळ, येरवडा येथील चायनीज हॉटेलमध्ये घुसून मालकाला मारहाण करून रोकड चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास, फिर्यादी यांचा मुलगा हॉटेलमध्ये गल्ल्यावर थांबला असताना, दोन व्यक्ती हॉटेलमध्ये येऊन फिर्यादी यांच्या मुलाच्या डाव्या हाताच्या बोटांवर धारदार हत्याराने वार करून दुखापत केली आणि शिवीगाळ केली.

त्यांनी गल्ल्यातील ७,०००/- रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत खेडकर करीत आहेत.