आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या बहाण्याने १५ लाखांची फसवणूक

Spread the love

पुणे : आयपीओत गुंतवणुकीच्या बहाण्याने मांजरी येथे राहणाऱ्या तरुणाची १५ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा प्रकार १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी मोबाईलवरून संपर्क साधला. शेअर खरेदीसाठी विविध बँक खात्यांचे तपशील देत, शेअर तसेच आयपीओ मिळवून देतो असे प्रलोभन दाखवले.

गुंतवणूक करण्यासाठी पैसे खात्यात भरण्यास भाग पाडून फिर्यादीची १५,९५,०००/- रुपये आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे करत आहेत.