आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भुसारी कॉलनी, कोथरुडमध्ये महिलेचे मंगळसूत्र पळवले

Spread the love

पुणे : भुसारी कॉलनी, कोथरुडमध्ये पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र पळवण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ७५ वर्षांची आहे. त्या मॉर्निंग वॉक करून घरी येत असताना दुचाकीवर आलेल्या तरुणाने फिर्यादींच्या गळ्यातील ७०,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे चेन जबरदस्तीने चोरी करून नेले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बंसवराज माळी करत आहेत.