आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विचित्र अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Spread the love

पुणे : महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा नाहक जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचा घनकचरा वाहतूक करणारा ट्रक सकाळी ८:४५ वाजता आयुष मेडिकल समोर, सातवनगर, हांडेवाडी रोडवरून भरधाव जात होता.
चालकाने वाहतुकीचे नियम धुडकावून ट्रक झाडाला धडक दिली.

त्या धडकेने झाडाची फांदी तुटून ट्रकच्या मागे दुचाकीवर येणाऱ्या दुचाकीस्वारावर पडली. त्यामुळे दुचाकीस्वार खाली पडले. या अपघातात पंडित फकीरा पाटील (वय ५८ वर्षे, रा. वैष्णवी सिटी, प्लॅट नं. ४०४, आदर्श नगर, पुणे) हे गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे करत आहेत.