आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ज्याला अंतरज्ञान तो सर्वात सुखी : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 6, 2024
Spread the love

पुणे : ज्याच्याकडे परिग्रहाच्या दृष्टीने बघितले, सत्तेच्या दृष्टीने बघितले, साधनेच्या दृष्टिकोनातून बघितले तरी जगात सर्वात सुखी कोण आहे? मला विचाराल तर परमात्म्याचा आपल्याला जबरदस्त आधार आहे आणि सर्वात सुखी अंतरज्ञानीच आहे असे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

प.पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, ज्या जीवांना परमात्म्याप्रती आस्था आहे त्यांनी त्याची स्तुती केली आहे तो परमात्मा कोण? कसा? तर तो अंतर्यामी आहे, सर्वात्मशुद्ध आहे. आपण जगात जर कोणाला विचारले सर्वात जास्त ज्ञानी कोण? तुमच्या जीवनात तुम्ही काय बनणार? जर कोणी तुम्हाला विचारले तुम्ही कोण बनणार? तुम्हाला विचारलं सगळ्यात जास्त सुखी कोण? तुम्ही कोणाचे नाव घ्याल?

सगळ्यात जास्त शक्तिशाली, यशस्वी सत्ताधीश कोण आहे? सगळ्यात छोटेसे राष्ट्र आहे पण संपन्न आहे तेथील व्यापाऱ्यांना टॅक्स द्यावा लागत नाही. तेथील लोकांना शिक्षणासाठी आणि ज्ञानासाठी इकडे तिकडे बघावं लागत नाही.तेथे कोण सुखी आहे? एका व्यक्तीकडे जेवढी संपत्ती असली म्हणजे तो सुखी आहे का?

परमात्म्याच्या गोड पाण्याचा आपल्याला जबरदस्त आधार आहे. आपले जीवन खाऱ्या विहिरीसारखं आणि की गोड पाण्यासारखं? आपलं जीवन गोड पाण्यासारखं आहे. महावीरांचे जीवन लोकांसाठीच होते. 30 वर्ष ते लोकांमध्ये राहिले. पण कोणी त्यांच्याविषयी तक्रार केली नाही. ते म्हणाले, तुमचे जीवन सामान्य नाही, देवाला देखील तुमचे जीवन अतिशय प्रिय आहे.

तुम्ही त्या मार्गावर छोटेसे पाऊस जरी उचलले एखादी दृष्टी टाकली सत्कारत्मकतेसाठी तुमचा एक क्षण जरी दिला तरी तुम्ही हळूहळू त्या ध्येयापर्यंत पोहोचाल.आपल्या अंतर्मनात डोकावून बघितले तर काय दिसेल द्वेष,वैमानस्य, स्वार्थ, इर्षा, निंदा, पण एक व्यक्ती असा जन्माला आला ज्याने पृथ्वीपासून आकाशापर्यत सगळ्यांच्या जीवनावर आनंद पेरला.

त्याने फक्त चारी दिशेला आनंद पसरविला. त्याचे आपण पांग फेडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.