येरवडा मध्यवर्ती कारागृहात उपक्रम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा महिला कारागृहातील महिला कैद्यांसाठी समता फाऊंडेशन या संस्थेमार्फत आयोजित रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सुनिल ढमाळ, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सदर स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या महिला कैद्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
समता फाऊंडेशन, मुंबई या सेवाभावी संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवर्ती कारागृह व महिला कारागृहातील बंद्यांसाठी विविध आजारांवरील वैद्यकीय शिबिरे, स्पर्धा, विविध उपक्रम राबविण्यात येतात.
हा उपक्रम प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून व स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमास सुनिल एन. ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे, पी. पी. कदम, अति. अधीक्षक, आनंदा एस. कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, आर. ए. खिलारी, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, पोर्णिमा पालोदकर, त्रिलाक्षी गवळी, शिक्षिका, समता फाऊंडेशन या संस्थेच्या प्रतिनिधी रोहिणी नेमणार, सामाजिक कार्यकर्ता हिना सय्यद व कारागृह महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
