आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सत्वंसरी महापर्व बिबवेवाडी जैन स्थानकमध्ये साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 9, 2024
Spread the love

पुणे : बिबवेवाडी जैन स्थानकात सत्वंसरी महापर्व उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी “क्षमा वीरस्य भूषणम्” हा संदेश देत प. पू. महासती श्री. सुप्रियदर्शनाजी म. सा. यांनी क्षमेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

त्यांनी सांगितले की, क्षमा करणे हे वीरांचे लक्षण आहे, आणि क्षमा मागणे किंवा देणे हे बलशाली मनाचे कार्य असते. प्रत्येकाने आपले मन निर्मळ करून सर्वांना क्षमा करणे आणि आपल्या चुका निर्भयपणे मान्य करून क्षमा मागणे आवश्यक आहे. या दिवशी बिबवेवाडी जैन स्थानकात २०२४ चा चातुर्मास उत्साहात सुरू झाला.

महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पू. डॉ. श्री. ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न प. पू. श्री पुष्पचुलाजी म. सा., आणि अनुशासनप्रिय प. पू. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. आदी ठाणा ५ यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम पार पडला.

महासती प. पू. सुप्रियदर्शनाजी म. सा. यांनी या प्रसंगी सांगितले की, दैनंदिन जीवनात अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला दुसऱ्याशी मतभेद होत असतात आणि मनात वैरभाव निर्माण होतो. आपल्या मनातील वैरभाव वर्षानुवर्ष टिकून राहतो आणि त्यामुळे संसारातील भ्रमण वाढते.

सत्वंसरी महापर्वाच्या निमित्ताने सर्वांनी मनातील गाठी सोडून एकमेकांना क्षमा करावी आणि क्षमा मागावी, असे त्यांनी आवाहन केले. या महापर्वाच्या निमित्ताने जैन बंधू भगिनींनी तपश्चर्या केली. ४७ सिद्धी तप, तसेच ४० जणांनी १५ उपवास, ९ उपवास, ८ उपवास, तेला, बेला आणि अनेकांनी एक उपवास तसेच एकासन, आयंबिल केले.


या प्रसंगी श्री भक्तामर जापचा कलशाचा लाभ श्री मंगला जयचंदजी झुंबरलालजी खिवंसरा आणि नवकार महामंत्राचा कलशाचा लाभ आशिष माणिकचंदजी दुगड यांनी घेतला. या प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बिबवेवाडी श्री संघाच्या कार्याची प्रस्तावना संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी केली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष माणिक दुगड यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिबवेवाडी श्री संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, पन्नालाल पितळीया, गणेश ओसवाल, अविनाश कोठारी, लालचंदजी कर्नावट, सुनील बलाई, प्रवीण चोरबेले, सुभाष बाफना, संपत भटेवरा, संजय श्रीश्रीमाळ, अशोक नहार, रवींद्र दुगड, सुनील दुगड, विजय समदडिया, चंपालाल नहार, कीर्तिराज दुगड, प्रकाश गांधी, चंद्रकांत सुराणा, बाळासाहेब कोयाळीकर, रामलाल संचेती, चंद्रकांत लुंकड यांनी बहुमोल योगदान दिले.