आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दरोडयाच्या गुन्हयाची 12 तासात उकल, 7 आरोपीना अटक

Spread the love

सोलापूर : दरोडयाची गुन्हयाची 12 तासाच्या आत उकल करून 7 आरोपीना अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा, सोलापूर तालुका यांना यश आले आहे. पोलिसांनी 2 लाख 40 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 03 सप्टेंबर रोजी सायंकाळी 06.30 वा सुमारास स्वप्निल चंद्रकांत भानप, (वय 49 व्यवसाय नोकरी रा.150 रेल्वे लाईन डफरीन चौक सोलापूर) हे तळेहिप्परगा येथील तलावाच्या बंधारा जवळ फिरण्यासाठी गेले होते.

त्यावेळेस तेथे 5 ते 6 जनाचे टोळके रिक्षातून आले. फिर्यादीस तु कुठल्या मुलीला भेटायला आला आहे, आम्हाला माहिती आहे असे म्हणुन शिवीगाळी, दमदाटी करून तुला पोलीसांच्या हवाली करतो असे म्हणुन दमदाटी केली. तेथे काही वेळाने दुचाकी मोटार सायकलीस फायबर काठी लावलेली आणखी दोन तरुण आले.

तेंव्हा त्यातील एका इसमाने फायबर काठी काढुन भानप यांना मी पोलीस असल्याचे सांगुन मुलीला भेटायला आला आहे काय, चोरी करायला आला आहे असे म्हणुन पोलीस ठाणेला चल असे त्यांना फायबर काठीने मारहाण केली.

इतर तरुणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भानप यांचेकडे पैशाची मागणी करून त्यांचे पॅन्टच्या खिशातील 1000/-रूपये रक्कम जबरदस्तीने काढुन घेतले. त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेऊन त्यांना फायबर काठीचा धाक दाखवुन त्यांचा फोन पे नंबरचा पासवर्ड विचारून त्यामधुन 43,000/-रूपये रक्कम फोन पे वरून जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेऊन भानप यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

म्हणुन स्वप्निल भानप यांनी पोलीस ठाणेच्या दिलेल्या फिर्यादी वरून सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस दरोडयाच्या गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांचेकडे देण्यात आला होता.


सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व गुन्हे प्रकटीकरणातील कार्यरत असलेले पोलीस अंमलदार हे तळेहिप्परगा येथे पेट्रोलिंग करत असताना ल अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे गोपनिय बातमीदार यांचे करवी संशयित आरोपी यांनी गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या बातमी नुसार सर्व संशयित आरोपी यांचा शोध घेतला तेंव्हा तेथे 7 संशयित आरोपी मिळुन आल्याने त्या सर्वांना गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतले. त्या सर्वांकडे गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करून तपास केला तेंव्हा सुरूवातीस त्या सर्वांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली.

त्यानंतर विशेष पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्या सर्वांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस करून तपास केला असता त्या सर्वांनी मिळुन गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान अटक केलेल्या गुन्हयातील आरोपी यांचे कडुन गुन्हयात वापरलेली 1 लाख 50 रूपये किंमतीची रिक्षा, 50 हजार रूपये किंमतीची मोटार सायकल, 100 रूपये किंमतीची फायबर काठी व फिर्यादी यांना धमकी देऊन त्यांचेकडुन जबरदस्तीने काढुन घेतलेल्या रोख रक्कमपैकी 40 हजार हजर रोख रक्कम असा एकूण 2 लाख 40 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गुन्हयातील अटक केलेल्या 7 आरोपी यांनी अशाच प्रकारे कोठे गुन्हे केले आहेत काय या अनुषंगाने त्याचेकडे तपास व त्यांच्या गुन्हेगारी अभिलेखाची पडताळणी झाले नंतर त्याचेकडुन आणखीन गुन्हयांची उकल होण्याची शक्यता असल्याचे.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी याव्दारे सांगितले.

सदरची कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर अपर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, गुन्हे प्रकटीकरणातील सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, श्रीराम आदलिंग, पोलीस नाईक लालसिंग राठोड, अनंत चमके, नागेश कोणदे, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ व वैभव सुर्यवंशी यांनी पार पाडली आहे.