आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

धायरीत महिलेने केली दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 11, 2024
Spread the love

पुणे: धायरी परिसरातील बारंगणी मळा येथे राहत्या घरात महिलेने दागिने चोरल्याची तक्रार दाखल झाली आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना ७ ते ९ जुलै दरम्यान घडली आहे. फिर्यादी महिलेच्या राधिका रॉयल, एफ विंग, फ्लॅट नं. २०२, बारंगणी मळा येथील फ्लॅटला कुलूप लावून बंद असताना संशयित महिलेने त्यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला.

तिने बेडरूममधील कपाटातील सोन्याचे व हिऱ्याचे दागिने असा एकूण ६,२०,०००/- रुपये किमतीचा ऐवज चोरी केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. निकम करीत आहेत.