आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुलाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरली

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 11, 2024
Spread the love

पुणे : खडकी परिसरातील सेंट इग्नेशियस चर्च येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या मुलाची सोन्याची चेन चोरट्यांनी बळजबरीने चोरल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सेंट इग्नेशियस चर्च, खडकी येथून फिर्यादी पायी जात असताना आलेल्या इसमांनी फिर्यादींच्या जवळ येऊन, फिर्यादींच्या काखेत असलेल्या मुलाच्या गळ्यातील ३०,०००/- रुपये किमतीची सोन्याची चेन जबरी चोरी करून नेली.

पुढील तपास अंमलदार, सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख करीत आहेत.