आवृत्ती पुणे
← Back to Homepage

येरवड्यात दुचाकीस्वार तरुणाला लुटले

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 11, 2024
Spread the love

पुणे : नाईक नगर येथून जय जवान नगरकडे जात असताना येरवड्यात दुचाकीस्वार तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी पहाटेच्या सुमारास मोटारसायकलवरून नाईक नगर येथून जय जवान नगरकडे जात होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या दोघांनी फिर्यादींना धारदार हत्याराचा धाक दाखवून खिशातील ५५००/- रुपये रोख जबरदस्तीने चोरी करून नेले.


पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम करीत आहेत.