आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महिलेच्या खुनातील दोन आरोपींना केले अटक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Police • September 14, 2024
Spread the love

सोलापूर : महिलेचा खून करून चार महिन्यापासून फरार असलेल्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या पोलीस पथकाने अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीणचा पदभार घेतल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील चालू वर्षातील उघडकीस न आलेल्या खूनाच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला होता. त्यामध्ये कामती पोलीस ठाणेयेथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी मिळत न्हवते. सिंधुबाई हरीबा घाडगे ( वय ७४ वर्षे, रा. अरबळी ) या त्यांचे शेतातील वस्तीवरील घरात एकट्याच राहत होत्या.

दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी रात्री जेवण करून त्या झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिणे चोरण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्या जागीच मयत झाल्या होत्या, सदर गुन्ह्याचा तपास हा सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार कामती पोलीस ठाणे हे करत होते. परंतु अद्याप सदरचा गुन्हा उघडकीस आला नव्हता.

यामुळे अतुल कुलकर्णी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणनेबाबत सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना सुचना दिल्या. त्यावरून सुरेश निंबाळकर यांनी गुन्ह्याच्या झालेल्या तपासाचा आढावा घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व त्यांच्या पथकास मार्गदर्शन केले होते.

रविराज कांबळे यांचे पथकातील हरीश थोरात व राहूल दोरकर यांना सदरचा गुन्हा करणारे आरोपींची माहिती गोपनीय बातमीदारांकडून समजली होती. त्यावरून सदरचे पथक हे आरोपीच्या मागावर असताना दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी ते २ आरोपी हे बेगमपूर येथील पुलाखाली थांबले असल्याची माहिती समजली होती.

त्यावरून रविराज कांबळे यांनी पथकासह बेगमपूर येथे जावून सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने आरोपीना ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये सदर आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

आरोपींना पुढील तपासकामी कामती पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार कामती पोलीस ठाणे हे करत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, हवालदार प्रकाश कारटकर, विरेश कलशेड्डी, हरीश थोरात, राहूल दोरकर, धनराज गायकवाड, अजय वाघमारे, यश देवकते, सागर ढोरे-पाटील, अन्वर आतार, सतिश बरकुल यांनी केली आहे.