आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या मूर्तीची दिलीप सोपल यांच्या हस्ते आरती

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 16, 2024
Spread the love

बार्शी : येथील ३ कंदिल चौक सोमवार पेठ येथील श्री सिद्धिविनायक तरुण गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची आरती माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आली.

सिद्धिविनायक मंडळ अनेक वर्षांपासून गणेश भक्तांना वेगवेगळ्या ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिक देखावे सादर करुन आपल्या मंडळाची वेगळी ओळख निर्माण करीत असल्याचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगितले. यावेळी उपस्थित माजी मंत्री दिलीप सोपल, युवा नेते आर्यन सोपल, विरोधी पक्षनेते नागेश आक्कलकोटे, विकी रसाळ, बंडू माने, प्रभाकर नायकोजी आदीं उपस्थित होते.

आत्तापर्यंत बालगणेश, कुंभकरण निद्रा, नरसिंह अवतार, रामायण मधले लक्ष्मण शूर्पणखा चे नाक कापले, एकनाथ महाराज तसेच मागील वर्षी चौपाटीवरील आनंद म्हणून बाल गोपालांचा मनोरंजनासाठी ५ दिवस मोफत पाळणे ठेवण्यात आले याच्यासह सामाजिक व धार्मिक देखावे सादर करण्यात आले आहे.

यावेळी माजी मंत्री दिलीप सोपल व मान्यवरांच्या हस्ते गणेश मुर्तीची आरती करण्यात आली. देखाव्यासाठी गिरीष नायकोजी, सुमित माने, विलास पवार, विशाल नायकोजी, कालिचरन वस्ताद, प्रथमेश बेळे, सोनू नायकोजी, हरिष अवधूत, अथर्व माने, सुजित दहीहंडे, बबन नायकोजी, प्रसाद दहीवाले, स्वप्नील नायकोजी, सागर मस्के, धर्मराज नायकोजी, आभिषेक नायकोजी आदींनी परिश्रम घेतले.