आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 20, 2024
Spread the love

पुणे : तुळापूर ते फुलगाव रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला.

या अपघातात लक्ष्मण मुंजाजी काळे (वय ७२ वर्षे, रा. सैनीकी शाळेसमोर, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) हे ठार झाले. पोलिसांनी टेम्पो चालक मराबाबा काळे (वय ३३ वर्षे, रा. फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.