आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीत नवचेतना मैत्री फेस्टिव्हलचे दिमाखात उद्घाटन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 21, 2024
Spread the love

बार्शी : लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी आयोजित नवचेतना मैत्री फेस्टिव्हलचे उद्घाटन डिस्ट्रीक्ट गवर्नर एम.जे.एफ. ला. अ‍ॅड. एम. के. पाटील, तसेच वूमन एम्पॉवरमेंट डिस्ट्रिक्ट चेअरमन एम.जे.एफ. ला. चेतना होमकर आणि लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष ला. महावीर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले..

या क्लबच्या माध्यमातून ‘बचपन ते पचपन’ ही संकल्पना राबवली आहे, ज्यामुळे महिला आणि लहान मुले यात सहभागी होऊ शकतात. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत, त्यांच्या छोट्या कलागुणांना वाव दिला जात आहे. या नेटके व सुंदर फेस्टीवलच्या नियोजनाचे कौतुक एम.जे.एफ. ला. चेतना होमकर यांनी केले आणि फेस्टिव्हलसाठी शुभेच्छा दिल्या.

“महिलांमध्ये सुप्त गुण असतात आणि या गुणांना वाव मिळाल्यास त्या आपल्या जीवनाचे सार्थक करू शकतात. या अनुषंगानेच बार्शीतील लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीने नवचेतना मैत्री फेस्टिव्हल आयोजित केले आहे,” असे प्रकल्प प्रमुख ला. शर्वरी फुरडे म्हणाल्या. विविध प्रकारचे शॉपिंग स्टॉल्स आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत.

हा कार्यक्रम मुली व महिलांसाठी २१ व २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत लिंगायत बोर्डिंग येथे होत आहे. सर्व बार्शीकर महिलांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन अध्यक्ष विद्या काळे व तेजस्विनी सदस्यांनी केले आहे.

या उद्घाटनासाठी डिस्ट्रीक्ट सीओ. ला. गंगाप्रसाद बंडेवार, चिपळूण येथील ला. संतोष होमकर, लिओ अध्यक्ष गौरव देढिया, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी व लिओ टाऊनचे पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.

या कार्यासाठी लायन्स तेजस्विनीच्या अध्यक्ष ला. विद्या काळे, सचिव ला. प्राची जमदाडे, खजिनदार ला. कविता अंधारे, ला. शर्वरी फुरडे, ला. योगिता कटारिया, ला. वैशाली शहा, ला. पल्लवी बजाज यांनी परिश्रम घेतले आहेत. सूत्रसंचालन ला. जयश्री ढगे व सोनाली कसपटे यांनी तर प्राची जमदाडे यांनी आभार प्रदर्शन केले.