आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलाने वृद्धास केली मारहाण

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 23, 2024
Spread the love

पुणे : किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलाने डोक्यात दगड घालून एका वृद्ध नागरिकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री १०:३०च्या सुमारास टू-व्हीलर गॅरेजच्या दुकानासमोर, गणेश कॉलनी, महादेव नगर, सिंहगड रोड येथे घडली. फिर्यादी यांचे वडील त्या ठिकाणी उभे असताना, अल्पवयीन मुलाने गुळणा करताना फिर्यादी यांचे वडीलांच्या अंगावर पाणी उडवले.

त्यावेळी फिर्यादी यांच्या वडिलांनी त्या मुलाला कानाखाली मारून त्याला जाब विचारला. त्याचा राग येऊन त्या बालकाने धमकी देत, जवळ असलेला दगड उचलून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचे वडीलांच्या डोक्यावर मारले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. हा तपास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर करीत आहेत.