आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने केली मारहाण

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 23, 2024
Spread the love

पुणे : पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना कुबेरा कॉलनी, एन.आय.बी.एम रोडवर घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी (२२ सप्टेंबर) एस. टायर या पंक्चर दुकानात त्यांच्या चारचाकी गाडीचे पंक्चर काढत होते. फिर्यादीने त्याचा फोन उचलला नाही आणि पेट्रोलसाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून आरोपी तरुणाने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

तसेच, फिर्यादीच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. फिर्यादीला गंभीर जखमी करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पोलिसांनी अरबाज अरिफ सय्यद (वय २८ वर्षे, रा. कुबेरा कॉलनी, एन.आय.बी.एम रोड, कोढवा खुर्द) याला अटक केली असून हा तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत.