आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मॉर्निग वॉक करताना मंगळसूत्र हिसकावले

Spread the love

पुणे : टिंगरेनगर येथे एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक दरम्यान दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंगरेनगर मधील एक तरुणी रविवारी (दि. २२ सप्टेंबर) सकाळी साडेसातच्या सुमारास सनशाईन हॉटेलच्या समोरील रस्त्यावर शारदा हॉटेलजवळून जात असताना, मोपेडवर आलेल्या चोरट्याने तिच्या गळ्यातील ४१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. हा तपास पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले करत आहेत.