आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रीपेड टास्कच्या बहाण्याने २२ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • September 24, 2024
Spread the love

पुणे : प्रीपेड टास्कच्या बहाण्याने २२ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार पेरणे फाटा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी तरुणाने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी 2024 दरम्यान फिर्यादी महिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. फिर्यादीला टेलिग्रामवर वर्क फ्रॉम होमचा मेसेज पाठवला. त्याबाबत फिर्यादीने अधिक माहिती विचारल्यानंतर, संबंधिताने टास्क करण्यास सांगितले आणि काही रक्कम परत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर, प्रीपेड टास्कमध्ये जास्त परतावा मिळण्याचे आमिष दाखवून, फिर्यादीने विविध बँकांमध्ये संबंधिताच्या सांगण्याप्रमाणे रकमा भरून टास्क पूर्ण केले. त्यासाठी फिर्यादीने एकूण २२,५०,००९ रुपये भरले होते. त्यापैकी प्राप्त झालेली रक्कम वजा करून, २१,९४,३२३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड करत आहेत.