आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीच्या बहाण्याने ३४ लाखांची फसवणूक

Spread the love

पुणे : गुंतवणुकीच्या बहाण्याने ३४ लाखांची फसवणूक करण्याची घटना शहराच्या मध्यवर्ती तांबडी जोगेश्वरी परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एका अनोळखी तरुणाने ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान मोबाईलवर संपर्क साधला. ऑनलाईन माध्यमातून फिर्यादीला शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून, संगनमत करून शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक परताव्याचे आमिष दाखवले व गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

फिर्यादीची एकूण ३४,२०,४३३/- रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके तपास करीत आहेत.