आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हायवेवरील टेम्पो चोरी करणारा जेरबंद

Spread the love

पुणे : हायवेवरील टेम्पो चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलीसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑक्टोबर रोजी नवले ब्रिजकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, राजमाता उद्यानाच्या शेजारी फिर्यादींनी त्यांचा टेम्पो लॉक करून पार्क केला होता. तो कोणीतरी चोरून नेला, अशी फिर्यादींनी तक्रार दिल्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी पोलीस पथकाला सुचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केले. तपास पथकातील अधिकारी अंमलदार महेश बारवकर, सचिन गाडे हे शोध घेत होते.

त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, हा टेम्पो हा रेकॉर्डवरील आरोपी प्रशांत दिगंबर पाटील (वय ४० वर्षे, रा. कृष्णा वॉटर पार्क, सिंहगड रोड, सुभेदार हॉटेलजवळ, मूळ रा. जि. छत्रपती संभाजीनगर) याने चोरला असून, तो टेम्पो घेऊन नाशिक येथे जात आहे.

त्यानुसार पोलीस अंमलदार महेश बारवकर आणि सचिन गाडे यांनी नाशिक येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार चोरी गेलेला टेम्पो ताब्यात घेतला आणि आरोपीला अटक केली सदर कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार महेश बारवकर, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, मंगेश पवार, सतीश मोरे, नवनाथ भोसले, निलेश खैरमोडे, मितेश चोरमाले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.