बार्शी पोलिसांची कारवाई : साडेतीन लाखांची रोकड जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : धसपिंपळगाव रस्त्यावरील बायपास चौका नजीक पत्रा शेडच्या मागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून बार्शी शहर पोलिसांनी तीन मोटारसायकली, ३,५०,१००/-रू रोख रक्कम ,व जुगार साहित्य, मोबाईल जप्त केले आहेत.
पोलिसांनी दहा जणांना मन्ना जुगार खेळताना ताब्यात घेतले आहे. एकजण पळून गेला . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेत काम करणारे पोलीस अंमलदार प्रल्हाद मारुतराव आकुलवार यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांना बायपास चौकानजीक पत्रा शेडच्या मागे जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी खासगी वाहनाने जात रात्री आकारच्या सुमारास छापा टाकला. तेथे दहा ते बारा जण गोल करून मन्ना जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या समोर रोकड होती. पोलिसांनी पंचा समक्ष त्यांना ताब्यात घेतले व रोकड, मोटारसायकली जप्त केली. यावेळी एक जन पळून गेला.
पोलिसांनी १) अनिकेत नवनाथ गायकवाड (वय २९ वर्षे )रा. आझाद चौक बार्शी ता. बार्शी २) प्रेमनाथ हिमंत शेंडगे (वय ४० वर्षे) रा. शेंडगे प्लॉट उपळाई रोड बार्शी ता. बार्शी ३) राहुल राजेंद्र गव्हाणे (वय २१ वर्षे) रा. मांगडे चाळ बार्शी ता. बार्शी ४) आकाश बापुराव कोकाटे (वय २७ )वर्षे रा. घोडके प्लॉट बार्शी ता. बार्शी ५) अक्षय सिध्देश्वर कवडे (वय २९ वर्षे) रा. आझाद चौक बार्शी ता. बार्शी ६) राहुल भगवान उंदरे वय ३५ वर्षे रा. सुभाषनगर बार्शी ता. बार्शी ७) धंनजय शिवाजी मोरे (वय ४७ वर्षे) रा. कसबा पेठ बार्शी ८) संतोष शंकर धुमाळ (वय ५४ वर्षे)रा. कसबा पेठ बार्शी ता. बार्शी ९) नवनाथ किसन जाधव (वय ४६वर्षे ) रा. सुभाषनगर बार्शी ता. बार्शी १०) कदीर इमान रमदान ( वय २९ वर्षे) रा. नांदेड प्लॉट परांडा रोड बार्शी ता. बार्शी यांना ताब्यात घेतले आहे.
त्यावेळी गर्दीचा गोंधळाचा व अंधाराचा फायदा घेवुन पळून गेलेल्या इसमाबाबत चौकशी केली असता त्याचे नाव कृष्णा रजपुत रा. आझाद चौक बार्शी ता. बार्शी असे असल्याचे खात्रीशीर समजले. बार्शी शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि बाळासाहेब जाधव, पोहेकॉ बाळकृष्ण डबडे, अमोल माने,बाबासाहेब घाडगे, पोकॉ राहुल उदार, सचिन देशमुख, अविनाश पवार, सचिन नितनात, अंकुश जाधव, मपोना स्वाती डोईफोडे यांनी या कारवाईत भाग घेतला.
