आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बार्शीचे पोलीस हवालदार अमृत खेडकर ठरले ‘आयर्नमॅन’

Spread the love

बार्शी : गोवा येथील ‘आयर्नमॅन ‘ स्पर्धेत सोलापूर ग्रामीण पोलीस दलात टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी ‘आयर्नमॅन’ होण्याचा बहुमान मिळवला. त्यामुळे, सोलापूर ग्रामीण पोलीस दलास प्रथमच ‘आयर्नमॅन होण्याचा सन्मान अमृत खेडकर यांच्या रूपाने मिळाला आहे. अमृत खेडकर हे मूळ बार्शीतील रहिवासी आहेत.

इंटरनॅशनल ट्रायथलॉन आयर्नमॅन स्पर्धा २७ डिसेंबर रोजी गोवा येथे झाली असून, ५० देशातील विविध भागातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या स्पर्धेपैकी एक असलेल्या या स्पर्धेचा गोवा येथील मिरामार बीच मधील समुद्रात प्रारंभ झाला असून, यात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१.१ किमी धावणे यांचा समावेश होता.

आयर्नमॅन स्पर्धा जगातील एक प्रसिद्ध स्पर्धा असून, स्पर्धक या स्पर्धेसाठी तयारी करत असतात. ‘आयर्नमॅन ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेचे ११३ किमी अंतर ८ तास आणि ३० मिनिटात पूर्ण करण्याचे आवाहन स्पर्धकांसमोर होते. ही स्पर्धा त्यांनी ७ तास ३७ मिनिटात पूर्ण केली आहे. यापूर्वी त्यांनी मागील वर्षी बर्गमॅन ही स्पर्धा पूर्ण केली होती.

सोलापूर ग्रामीण २००७ बॅचचे सर्व सहकारी मित्र परिवार, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी- कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.